Join us  

सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला

भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे आणि त्यानं १४व्या पर्वातून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 7:32 PM

Open in App

भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे आणि त्यानं १४व्या पर्वातून माघार घेतली. २७ एप्रिलला त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला ही दुखापत झाली होती. त्यानं शस्त्रक्रीयेनंतर बीसीसीआय व डॉक्टरांचे आभार मानले. त्यानं ट्विट केलं की, आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया झाली आणि या काळात माझी काळजी घेणाऱ्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. बीसीसीआयचेही आभार.''IPL 2021 : RCB Vs DC T20 Live Score Update

३० वर्षीय नटराजननं सनरायझर्स हैदराबादकडून यंदाच्या पर्वात दोन सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं वन डे, ट्वेंटी- २० व कसोटी संघात पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियातील व्यग्र दौऱ्यामुळे त्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरता आले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला तंदुरूस्त जाहीर केलं गेलं, परंतु मैदानावर उतरण्यासाठी पूर्णपणे फिट नव्हता. नटराजननं आयपीएलच्या मागील पर्वात १६ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं यॉर्कर्सचा माराच केला होता.   

टॅग्स :आयपीएल २०२१टी नटराजनबीसीसीआय