Join us  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आलं टीम इंडियाच्या या क्रिकेटरचं करिअर! कधीही घेऊ शकतो निवृत्ती

रोहित शर्मा कर्णधार होताच या खेळाडूला कसोटी संघातूनही बाहेर करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 7:24 PM

Open in App

टीम इंडियाचा एक खेळाडू पुनरागमनासाठी डोळे लावून वाट पाहत आहे. निवड समितीने या खेळाडूला टीम इंडियातून बाहेर ठेवले आहे. आता या खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन होणे जवळपास अशक्य दिसत आहे. हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हाही निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहित शर्मा कर्णधार होताच या खेळाडूला कसोटी संघातूनही बाहेर करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. आता निवड समिती या खेळाडूला भारताच्या कुठल्याही संघात संधी देत नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात संपुष्टात आलं या खेळाडूचं करिअर -टीम इंडियाच्या या खेळाडूचे नाव आहे इशांत शर्मा. वेगवान गोलंदाज इशांतचे टीम इंडियातील पुनरागमन जवळपास अशक्य दिसत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला आता इशांत शर्माचा विसर पडल्याचे दिसत आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आलेली नाही. इशांत शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच त्याने अखेरचा आयपीएल सामना मे 2021 मध्ये खेळला होता. इशांत केव्हाही घेऊ शकतो निवृत्ती -मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारख्या वेगवान गोलंदाजांची तिकडी आता टीम इंडियाची फेव्हरीट बनली आहे. याशिवाय चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या रुपात उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर भारतीय सिलेक्टर्सचे फेव्हरिट बनले आहेत. यामुळे आता ईशांत शर्माचे टीम इंडियातील पुनरागमन अवघड वाटत आहे. महत्वाचे म्हणजे, ईशांत शर्माला IPL मध्येही संदी मिळेनासे झाले आहे. ईशांतने आईपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामने खेळले असून 72 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 12 धावांवर 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टॅग्स :इशांत शर्मारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App