Join us  

WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके!

दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:18 AM

Open in App

दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला. न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं अन् पहिल्या वहिल्या WTC स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. WTC Final नंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि तत्पूर्वी संघातील सर्वात अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) हा दुखापतग्रस्त झाला आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून त्यावर टाके लावावे लागले आहेत.

India’s schedule for next WTC: टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, घरच्या मैदानावर करणार न्यूझीलंडचा पाहुणचार! 

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विजयासमीप होता तेव्हा गोलंदाजी करताना इशांतला ही दुखापत झाली. रॉस टेलरनं मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात इशांतच्या बोटांना ईजा झाली आणि षटक पूर्ण न करता तो पेव्हेलियनला गेला होता. जसप्रीत बुमराहनं त्याचं षटक पूर्ण केलं. इशांतनं या सामन्यात ३१.२ षटकांत ३ विकेट्स घेतल्या.   बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, इशांतच्या उजव्या हाताच्या मधल्या व चौथ्या बोटावर टाके लावण्यात आले आहेत. त्याची दुखापत गंभीर नाही.  आता भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत. 

भारताचा इंग्लंड दौरा ( India tour of England, 2021) पहिली कसोटी - ४ ते ८ ऑगस्ट, ट्रेंट ब्रिजदुसरी कसोटी - १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरी कसोटी - २५ ते २९ ऑगस्ट, हेडिंग्लीचौथी कसोटी - २ ते ६ सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हलपाचवी कसोटी - १० ते १४ सप्टेंबर, ओल्ड ट्रेफर्ड  

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीइशांत शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड