भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबेने मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा भागात दोन अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती आहे. दोन्ही अपार्टमेंट डीएलएच एन्क्लेव्ह नावाच्या निवासी प्रकल्पाच्या १७ व्या आणि १८ व्या मजल्यावर आहेत. ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल स्क्वेअर यार्ड्सने इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेबसाइटवरून शिवम दुबेने मुंबईत घर खरेदी केल्याचे समजले. हा व्यवहार २० जून २०२५ रोजी नोंदणीकृत झाला, ज्यासाठी एकूण १.६५ कोटी मुद्रांक शुल्क आणि ३० हजार नोंदणी शुल्क भरण्यात आले होते.
शिवम दुबेने खरेदी केलेल्या दोन्ही अपार्टमेंटमध्ये एक टेरेस आहे, ज्याचा कार्पेट एरिया ४ हजार २०० चौरस फूट (३९० चौरस मीटर) आहे आणि दुसऱ्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया ३ हजार ८०० चौरस फूट (३५३ चौरस मीटर) आहे. दोन्ही अपार्टमेंटसाठी एकूण बिल्ट-अप एरिया ८९२.१९ चौरस मीटर (९,६०३ चौरस फूट) आहे. दोन्ही अपार्टमेंट २७.५० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. या परिसरात विनोदी कलाकार कपिल शर्मा, गायक मिका सिंग आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्यासह अनेक सेलिब्रेटी राहतात.
शिवम दुबेची कारकिर्द
शिवम दुबेने हा भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर आहे. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ३५ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४३ धावा आहेत आणि एक विकेट मिळवली आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ५३१ धावा केल्या आहेत आणि १३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तो सध्या चेन्नई सुपरकिंग्जचा भाग आहे.
Web Title: Team India cricketer Shivam Dube Buys Two Luxury Apartments Worth 27.50 Crore In Mumbai Oshiwara Area
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.