Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीची विश्वासार्हता वाढली, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावण्याच्या निर्धाराने आज पहाटे लंडनसाठी रवाना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 11:51 IST

Open in App

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावण्याच्या निर्धाराने आज पहाटे लंडनसाठी रवाना झाला. भारतीय संघाची कामगिरी पाहता यंदाच्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांत विराटसेना आघाडीवर आहे. कोहलीनंही सातत्यपूर्ण खेळ करताना विक्रमांचे शिखर सर केले. धावांचा पाठलाग करताना तर कोहलीची बॅट आणखी तळपते. त्यामुळे क्रिकेटविश्वास सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून त्याची ओळख तयार होत आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह खेळाडूचा मानही कोहलीनं पटकावला आहे. एका कंपनीनं केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे विश्वासार्हतेत कोहलीनं महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे.

कोहलीनं नुकता सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्सचा मान पटकावला. 10 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. देशातील सर्वात विश्वासू खेळाडूंत कोहली प्रथम स्थानावर आहे, तर तेंडुलकर आणि भारतीय वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. 16 शहरांतील 2315 ग्राहकांसोबत हा सर्व्हे करण्यात आला. सिनेमा, क्रीडा आणि उद्योग अशा वेगवेगळ्या विभागात हा सर्व्हे करण्यात आला. 

या क्रमवारीत सर्वात विश्वासू सेलिब्रेटीमध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, दीपिका पादुकोण, रतन टाटा, आण्णा हजारे, संदीप महेश्वरी, सुधा मुर्थी आणि जॉन सेना यांचाही क्रमांक येतो.

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकररोहित शर्मा