Join us

ZIM vs BAN : बांगलादेशच्या फलंदाजानं कळ काढली अन् झाला ना राडा; अंगावर धावून गेले खेळाडू, Video

ZIM v BAN Test : बांगलादेशनं ६ बाद १३२ धावांवरून मुसंडी मारताना झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:58 IST

Open in App

ZIM v BAN Test : बांगलादेशनं ६ बाद १३२ धावांवरून मुसंडी मारताना झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. ८ बाब २९४ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. महमुदुल्लाह आणि तस्कीन अहमद यांनी १३९* धावांची भागीदारी करताना बांगलादेशला मोठ्या धावांच्या दिशेनं कूच करून दिली आहे. तस्कीन अहमद त्याच्या फलंदाजीचा मनमुराद आस्वाद लुटताना दिसत आहे आणि त्या नादात त्यानं झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीची कळ काढली अन् त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. ( Taskin Ahmed Dances, Gets Involved With Blessing Muzarabani in Heated Clash ) 

बांगलादेशनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सैफ हसन ( ०) व नजमुल होसैन शांतो ( २) हे झटपट माघारी परतले. त्यानंतरही बांगलादेशची पडझड सुरूच राहिली. ६ बाद १३२ अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी कर्णधार मोमिनूल हक ( ७०) आणि लिटन दास ( ९५) ही जोडी धावली. त्यांनी १३८ धावांची भागीदारी केली. मेहदी सहन मिराज शून्यावर माघारी परतला. महमुदुल्लाह व तस्कीन यांनी दमदार खेळ करताना बांगलादेशचा डाव सावरला आहे. महमुदुल्लाहनं शतक झळकावले, तर तस्कीननं अर्धशतक पूर्ण केले. 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :झिम्बाब्वेबांगलादेश