'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट

हार्दिक पांड्याच्या चाहत्याच्या एका कमेंटनं सर्वांच लक्षवेधून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:15 IST2024-10-08T19:15:05+5:302024-10-08T19:15:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Talk of No Look Shot over 'Tere Karke'; Natasha's video and Hardik's air! | 'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट

'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट

Fan's reaction on Natasa Stankoic new music video: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशा स्टॅन्कोविक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय दिसते. आता ती आपल्या नव्या व्हिडिओ अल्बममुळे चर्चेत आल्याचे दिसते. एका बाजूला तिच्या या गाण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्याच्या चाहत्याच्या एका कमेंटनं सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे.  

व्हिडिओ अल्बम नताशाचा अन् हवा झाली हार्दिकची


नताशाचा जो व्हिडिओ अल्बम रिलीज झालाय त्यात ती पंजाबी सिंगर प्रीत इंदरसोबत झळकली आहे. तिच्या नव्या म्युझिक व्हिडिओचं टायटल 'तेरे करके' असं आहे. या गाण्यात नताशा स्टनिंग शिमरी आउटफिटमध्ये पंजाबी मुंडा प्रीत इंदरसोब रोमँटिग पोझ देतानाही दिसून येते. नताशाच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियेतून त्याची छोटीशी झलकही पाहायला मिळते. पण एका हटक कमेंटनं सर्वाधिक लेक्ष वेधूनं घेतलं आहे. कारण या कमेंटमध्ये हार्दिक पांड्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

नताशाच्या पोस्टवरील हार्दिकसंदर्भातील ही कमेंट ठरतीये लक्षवेधी 

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आली आहे. तिचा या गाण्यातील अंदाज हा कौतुकास्पद ठरत असला तरी एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडिओवर हार्दिक पांड्याचे ट्विस्ट जोडणारी कमेंट केलीये.  "तुम्हारे तेरे करके से ज्यादा हार्दिक पांड्या के एक शॉट के चर्चे हैं" (तुझ्या तेरे करके गाण्यापेक्षा हार्दिक पांड्याच्या नो लूक शॉटची चर्चा) ही कमेंट सर्वांचे लक्षवेधून घेते. आता हा नेटकरी हार्दिक पांड्याचा चाहता आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दिसला होता हार्दिक पांड्याचा स्वॅग 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ग्वाल्हेरच्या मैदानातील बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यातून हार्दिक पांड्याने पुन्हा टीम इंडियात कमबॅक केले. गोलंदाजीत एक विकेट घेतल्यानंतर पांड्याने सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला. या सिक्सरसह त्याच्या नावे खास विक्रमाचीही नोंद झाली. पण त्यापेक्षा चर्चेत आहे तो त्याने या सामन्यात खेळलेला नो लूक शॉट. हा फटका मारल्यानंतर त्याचा अंदाजही खास होता. याचा दाखला देतच नताशाच्या व्हिडिओ अल्बमपेक्षा हार्दिकचा तो शॉट भारी, अशी तुलना करण्यात आली आहे. 

Web Title: Talk of No Look Shot over 'Tere Karke'; Natasha's video and Hardik's air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.