Join us  

जगातील सर्वात मोठ्या MoteraStadiumचा पाहा फर्स्ट लूक...

या स्टेडियमचे उद्धाटन करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 4:28 PM

Open in App

जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम भारतामध्ये बनवण्यात आले आहे. या स्टेडियमचे उद्धाटन करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार आहे. पण या मोटेरा स्टेडियमचा फर्स्ट लूक, फक्त तुमच्यासाठी आणला आहे.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम बांधायला किती खर्च आला...गुजरातमधील अहमदाबाद येथे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनवले जात आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७मध्ये या स्टेडियमच्या बांधणीला सुरुवात झाली होती. आता काही दिवसांमध्ये हे स्टेडियम सज्ज होणार आहे.

या स्टेडियममध्ये काय असेल...हे स्टेडियम ६३ एकर जागेमध्ये बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ५० खोल्याही येणार आहेत. त्याचबरोबर ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल असून ७३ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. त्याचबरोबर तीन प्रॅक्टीस मैदानंही बनवण्यात आली आहेत.

या स्टेडियमची आसन क्षमता केवढी असेल...या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.

 

अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम आता सरदार वल्लभभाई स्टेडियम म्हणून ओळखलं जाणार असून त्याची प्रेक्षकक्षमता 1.10 लाख इतकी आहे. 2015साली 53000 प्रेक्षकक्षमता असलेलं मोटेरा स्टेडियम पाडून नवं स्टेडियम बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या स्टेडियमचं उद्धाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या स्टेडियमवर जागतिक एकादश आणि आशियाई एकादश असा ट्वेंटी-20 सामना खेळवण्यात येणार होता. पण, स्टेडियमचं काम वेळेत पूर्ण होत नसल्यानं हा सामना हलवण्यात आला. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या दरम्यान ते या स्टेडियमचं उद्धाटन करतील. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांची भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की,''अहमदाबाद विमानतळ ते स्टेडियमपर्यंत 5 ते 7 लाख लोकं उपस्थित राहणार आहेत. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. ते जवळपास बांधून तयार आहे.''  

या स्टेडियमच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमवर केवळ क्रिकेटचे सामने होणार नसून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, टेनिस, अॅथलेटिक्स ट्रॅकस स्क्वॉश, बिलियर्ड्स, बॅडमिंटन आणि स्विमींग आदी खेळही खेळले जातील.  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावरवॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसनं याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशा आशयाचं ट्विट व्हाइट हाऊसनं केलं आहे. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करत आहेत. तसेच भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे. 

भारतीय संघानं नोव्हेंबर 2019मध्ये कोलकाता येथील इडन गार्डनवर पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला होता. त्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात डे नाईट कसोटीचं आव्हान दिलं होतं. पेन म्हणाला होता की, " ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर-बोर्डर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेनपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेत भारताने एक दिवस रात्र कसोटी सामना खेळावा, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत." 

पण भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये एक आणि जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर एक असे दोन दिवस रात्र कसोटी सामने खेळणार आहे. आता जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे तरी कुठे आणि हा सामना होणार तरी कधी, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल...

टॅग्स :गुजरातडोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदी