T20World Cup Final, Australia : जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं Shoes Celebration; शूजमधून ड्रिंक्स घेताना दिसले ऑसी, Video Viral 

T20 World Cup Final, Australia won Title :पाच वन डे वर्ल्ड कप नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला कालपर्यंत एकही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. पण, अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:59 AM2021-11-15T09:59:32+5:302021-11-15T10:13:32+5:30

whatsapp join usJoin us
T20World Cup Final, Australia : Drinking from shoes celebration by Australia, dressing room video goes viral | T20World Cup Final, Australia : जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं Shoes Celebration; शूजमधून ड्रिंक्स घेताना दिसले ऑसी, Video Viral 

T20World Cup Final, Australia : जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं Shoes Celebration; शूजमधून ड्रिंक्स घेताना दिसले ऑसी, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final, Australia won Title : ऑस्ट्रेलियन संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि त्यांच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. पाच वन डे वर्ल्ड कप नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला कालपर्यंत एकही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. पण, अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडनं ठेवलेलं १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत सहज पार केलं. या विजयानंतर ऑसी खेळाडू भावनिक झालेले पाहायला मिळाले. समालोचन करणारा शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू) याच्याही डोळ्यांत आनंदाश्रू दिसले. ग्लेन मॅक्सवेल  सामन्यातील नायक मिचेल मार्श याला मिठी मारून ढसाढसा रडला. या सर्व भावनिक क्षणानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये विचित्र सेलिब्रेशन केलं. मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉयनिस व फिंच हे चक्क शूजमधून ड्रिंक्स घेताना दिसले. 

ड्रेसिंग रुममध्ये शूजमधून ड्रिंक्स घेतानाचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा व्हिडीओ आयसीसीनं पोस्ट केला आहे. शूजमधून ड्रिंक्स घेण्याचं सेलिब्रेशन हे ऑस्ट्रेलियासाठी नवीन नाही. ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन रेसर डॅनियल रिकियार्डो यानं हे सेलिब्रेशन फेमस केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू असं सेलिब्रेशन करताना अनेकदा दिसले.  


न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं  ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला.  मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला. 
 

 

Web Title: T20World Cup Final, Australia : Drinking from shoes celebration by Australia, dressing room video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.