IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

...अन् एकाच फ्रेममध्ये दिसली दोन वर्ल्ड चॅम्पियनची कॅप्टनची खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 19:25 IST2026-03-08T19:18:24+5:302026-03-08T19:25:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup Winning Captains MS Dhoni And Rohit Sharma With The Trophy In Ahmedabad Ahead Of The Final Watch Video | IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

IND vs NZ Final : हिटमॅन रोहित शर्मासोबत MS धोनीची एन्ट्री; आयकॉनिक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या हंगामातील जेतेपदासाठी भारत-न्यूझीलंड संघ मैदानात उतरण्याआधी खास क्षण पाहायला मिळाला. अंतिम सामन्यासाठी नाणफेक झाल्यावर गत हंगामात भारतीय संघाला जेतेपेद मिळवून देणारा रोहित शर्मा आणि टीम इंडियाला पहिली टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी हे दिग्गज एका फ्रेममध्ये दिसले. ही जोडी ट्रॉफी मैदानात घेऊन येतानाचा आयकॉनिक क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित शर्मा हा यंदाच्या ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हंगामातील ब्रँड ॲम्बेसेडर आहे. वनडेत सक्रीय असताना खास मान मिळालेला तो पहिला क्रिकेटर आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही त्याच्यासोबत दिसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना एक खास क्षण अनुभवायला मिळाला. या दोन दिग्गजांचा वारसा जपत सूर्यकुमार यादव टीम इंडियाला तिसरे आणि विक्रमी जेतेपद मिळवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.

IND vs NZ Final : नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूनं लागला, तरीही टीम इंडियासाठी शुभ संकेत, कारण...

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाने सलग दोन वेळा ट्रॉफी जिंकलेली नाही. एवढेच नाही तर घरच्या मैदानात कुणालाही जेतेपद मिळवता आलेले नाही. आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते करण्याच्या इराद्याने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मैदानात उतरला आहे. संघाला चीअर करण्यासाठी धोनी आणि रोहित मैदानात उपस्थितीत असल्यामुळे फायनल सामना आणखी खास ठरला आहे.

Web Title : IND vs NZ फाइनल: रोहित शर्मा और एमएस धोनी की शानदार एंट्री

Web Summary : भारत-न्यूजीलैंड फाइनल से पहले, रोहित शर्मा और एमएस धोनी एक साथ दिखाई दिए, ट्रॉफी मैदान पर लाए। सूर्यकुमार यादव की टीम रिकॉर्ड जीत का लक्ष्य रखते हुए, इस प्रतिष्ठित क्षण ने प्रशंसकों को उत्साहित किया। इन दोनों की उपस्थिति ने फाइनल को और भी खास बना दिया।

Web Title : IND vs NZ Final: Rohit Sharma and MS Dhoni's Iconic Entry

Web Summary : Before the India-New Zealand final, Rohit Sharma and MS Dhoni, former World Cup-winning captains, appeared together, bringing the trophy to the field. This iconic moment excited fans as Suryakumar Yadav's team aims for a record-breaking victory. The duo's presence made the final even more special.