ठळक मुद्दे१७ ऑक्टोबरला होणार सुरुवात
नवी दिल्ली : कोरोना काळात खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वाच्च प्राधान्य देण्याच्या हेतूने बीसीसीआयच्या यजमानपदाखाली आगामी टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातमध्ये होऊ शकते, असे संकेत सचिव जय शाह यांनी शनिवारी दिले. याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होईल, असेही ते म्हणाले.
कोरोनावर आमची नजर असून देशातील परिस्थिती पाहता हे आयोजन यूएईत हलविले जाऊ शकते. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य महत्त्वाचे असून लवकरच निर्णय घेतला जाईल,’ असे शाह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.
योजनेनुसार टी-२० विश्वचषकाची पहिली फेरी आठ संघांदरम्यान दोन गटात खेळविली जाईल. एकूण १२ सामने ओमानमध्ये होतील.
१७ ऑक्टोबरला होणार सुरुवात
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार यंदा आयपीएलचे उर्वरित सामने यूएईत १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकाला प्रारंभ होईल. १६ संघांचा समावेश असलेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित आहे.