मेलबोर्न : कोरोना संक्रमणामुळे पाहुण्या संघांच्या सरबराईसाठी अनेक बाबींची जुळवाजुळव करणे कठोण होणार असल्याने आॅस्ट्रेलियाने यंदा टी-२० विश्वचषकाचे आयोजन करू नये, असे मत या संघाचा फलंदाज ख्रिस लिन याने व्यक्त केले आहे.
३० वर्षांचा लिन म्हणाला, ‘कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत दोन लाखावर लोक मृत्युमुखी पडले. यापासून बोध घेत क्रिकेट प्रशासक संकटाची भीषणता लक्षात घेऊन चांगले काम करतील, अशी आशा आहे. टी-२० विश्वचषकाचे यंदा माझ्या देशात आयोजन होऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.’टी-२० विश्वचषकाचे आयोजन आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणार असले तरी सद्यस्थिती पाहता आयोजनाविषयी शंका वाटते.