T20 World Cup: सेहवाग आणि जडेजा रोहित शर्मावर भडकले, पराभवानंतर बोचऱ्या भाषेत सुनावले

या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 21:45 IST2022-11-10T21:43:15+5:302022-11-10T21:45:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup semi final ind vs eng virender sehwag and ajay jadeja furious at rohit sharma captaincy vs england | T20 World Cup: सेहवाग आणि जडेजा रोहित शर्मावर भडकले, पराभवानंतर बोचऱ्या भाषेत सुनावले

T20 World Cup: सेहवाग आणि जडेजा रोहित शर्मावर भडकले, पराभवानंतर बोचऱ्या भाषेत सुनावले

T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून सहज पराभव केला. यानंतर आता रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 16 षटकांत गाठले. या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेहवाग म्हणाला, आज रोहितवरचे प्रेशर स्पष्टपणे दिसत होते. तर जडेजा म्हणाला, टीम तयार करण्यासाठी कर्णधाराला संपूर्ण वर्षभर संघासोबत राहावे लागते.

क्रिकबझसोबत बोलताना अजेय जडेजा म्हणाला, 'मी एक गोष्ट बोलेल, जी टोचू शकते, रोहित शर्मा एकेल त्यालाही.. जर एखाद्या कर्नधाराला टीम तयार करायची असले, तर त्याला संपूर्ण वर्षभर संघासोबत रहावे लागते. संपूर्ण वर्षभरात रोहित शर्मा किती दौऱ्यांवर गेला. मी हे पराभवामुळे बोलत नाही, या पूर्वीही मी असे बोललो आहे. जेव्हा आपल्याला टीम तयार करायची आहे, तेव्हा आपण संघोसोबत नाही. कोचला टीम तयार करायची आहे, ते न्यूझीलंडला जात नाहीत. तर मग टीम कशी तयार होईल? 

तसेच वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'आज तो रोहित शर्मा दिसला नाही, जसा आधी कर्णधार म्हणून दिसाचा. आज पहिल्यांदाच त्यालाही प्रेशर जाणवल्यासारखे वाटले. त्याने जे बदल केले,  अक्षर पटेलकडून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करून घेतली, मोहम्मद शमीला गेंदबाजी दिली नाही. अर्शदीपला दुसरा ओव्हर मिळाला नाही, भुवीने पहला ओव्हर किपर वर ठेऊन फेकला. तर रोहित शर्मानेही आज कर्णधार म्हणून बऱ्याच गोष्टी व्यवस्थित केल्या नाहीत. आम्ही म्हणतो, की तो जगातील अथवा भारताचा बेस्ट कर्णधार आहे. मात्र, आज त्याने बऱ्याच गोष्ट व्यवस्थित केल्या नाहीत. जेव्हा एक कर्णधार म्हणून आपल्याला दबाव येतो, तेव्हा आपण अशा गोष्टी करता.'

इंग्लंडविरुद्धच्या या पराभवामुळे भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. T20 विश्वचषक 2014 नंतर भारताने या स्पर्धेचा अंतिम सामना खेळलेला नाही. तर, दुसरीकडे या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक घेतली आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानसोबत त्यांचा सामना होईल.

Web Title: T20 World Cup semi final ind vs eng virender sehwag and ajay jadeja furious at rohit sharma captaincy vs england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.