T20 World Cup, South Africa vs Bangladesh : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांच्या वादळी खेळीने बांगलादेशचा पराभव निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली आणि बांगलादेश संघाचा पाचोळा केला. आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवून ग्रुप २ मध्ये सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले. क्विंटन व रोसोवू यांची १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोसोवूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. एनरिच नॉर्खियाने १० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
शतक रिली रोसोवूचे पण चर्चेत आला गुस्ताव्ह मॅकेऑन! ट्वेंटी-२०त याच्या नावावर आहे वर्ल्ड रेकॉर्ड
कर्णधार टेम्बा बवुमा ( २) अपयशी ठरला. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसोवू यांनी ८५ चेंडूंत १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, २००७ मध्ये हर्षल गिब्स व जस्टीन केम्प यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १२० धावांची भागीदारी केली होती. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटन ३८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर बाद झाला. रोसोवू ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर झेलबाद झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा रोसोवून दुसरा फलंदाज ठरला. या विक्रम २०२२मध्ये फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅकेऑनने ( वि. स्वित्झर्लंड व नॉर्वे) केला आहे. आफ्रिकेने ५ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"