T20 World Cup, SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल, बांगलादेशला नमवून वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी 

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:32 PM2021-11-02T18:32:34+5:302021-11-02T18:32:56+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, SA vs BAN : South Africa (86/4) beat Bangladesh (84 all out) by six wickets in Group 1 match at Abu Dhabi | T20 World Cup, SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल, बांगलादेशला नमवून वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी 

T20 World Cup, SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेचं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल, बांगलादेशला नमवून वाढवल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेनं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल टाकताना बांगलादेचा डाव ८४ धावांवर गुंडाळला. कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी व अ‍ॅनरीज नॉर्ट्झे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आफ्रिकेचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु बांगालदेशनं त्यांनाही धक्के दिलेच. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला आधीच एक धक्का बसला होता. त्यांचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन ( Shakib ul Hasan) यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याचा परिणाम फलंदाजांच्या कामगिरीवर जाणवला. बांगलादेशचा संघ कोसळला. लिटन दास ( २४) व महेदी हसन ( २७) हे बांगलादेशचे टॉप स्कोअरर ठरले. कागिसो रबाडानं २० धावांत ३ आणि नॉर्ट्जेनंही ८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  शम्सीनं २१ धावांत २ आणि ड्वेन प्रेटोरीअसनं ११ धावांत १ विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात आफ्रिकेचे तीन फलंदाज ३३ धावांवर माघारी परतल्यानं सामन्यात थोडी चुरस निर्माण होताना दिसली. तस्कीन अहमदनं आफ्रिकेच्या रिझा हेंड्रीक्स ( ४) व एडन मार्कराम ( ०) यांना बाद केलं. क्विंटन डी कॉक १६ धावा करून महेदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी खिंड लढवताना आफ्रिकेला विजय मिळवून दिला. ड्युसेन २२ धावांवर बाद झाला. बवुमा ३१ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेनं ६ विकेट्स व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत. 

Web Title: T20 World Cup, SA vs BAN : South Africa (86/4) beat Bangladesh (84 all out) by six wickets in Group 1 match at Abu Dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.