Join us

मोहम्मद शमीवर संकट ओढावले; रामाचे नाव घेतल्याने कट्टरपंथीय खवळले, पण अनेकांनी त्याचे कौतुकही केले

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammad Shami) सध्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तंदुरूस्त होण्याची तयारी करतोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:10 IST

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammad Shami) सध्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तंदुरूस्त होण्याची तयारी करतोय... वर्ल्ड कपच्या राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला कोरोना झाला. पण, आता त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो NCA मध्ये तंदुरूस्त चाचणीसाठी गेला आहे. जसप्रीत बुमराहने माघार घेतल्याने शमीची मुख्य संघात वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे, परंतु त्याआधी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. अशात त्याने एक  संकट ओढावून घेतले आहे आणि त्याला निमित्त एक ट्विट ठरले आहे.

शमीने गुरुवारी दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आणि त्यानंतर कट्टरपंथीय खवळले. सोशल मीडियावरील काही युजर्सने त्याच्या या ट्विटला त्याच्या धर्माशी जोडून खूप वाईट सुनावलं. पण, काहींनी शमीचं कौतुकही केलं. शमीच्या या ट्विटला ४० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शमीने ट्विट करताना भगवान रामाचा फोटोही पोस्ट केला. त्याने लिहिले की, दसऱ्याच्या शूभ मुहूर्तावर मी भगवान रामाकडे प्रार्थना करतो की, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश येओ..  तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाना दसऱ्याच्या शुभेच्छा...   शमीने मागच्या वर्षी जुलै महिन्यात शेवटचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो संघाचा सदस्य होता. मागील वर्षभरात तो भारताकडून एकही ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. त्याने आतापर्यंत ६८ कसोटी, ८२ वन डे व १७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मोहम्मद शामीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2
Open in App