Join us

T20 World Cup, PAK vs SA : पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचला, तर ती अन् मी...! पावसामुळे वाढलं फॅनचं धाडस

T20 World Cup, Pakistan vs South Africa : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्गात पाऊस पुन्हा शत्रू बनून उभा राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:09 IST

Open in App

T20 World Cup, Pakistan vs South Africa : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्गात पाऊस पुन्हा शत्रू बनून उभा राहिला आहे. पाकिस्तानचे ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत आफ्रिकेला जबरदस्त धक्के दिले. टेम्बा बवुमा व एडन मार्कराम यांनी डाव सावरला, पण पावसाने आफ्रिकेचा खेळ बिघडवला. 

T20 World Cup, PAK vs SA : टीम इंडिया Semi Final मध्ये कोणाला भिडणार? पाकिस्तान-द. आफ्रिका सामन्यानंतर कसं असेल समीकरण?

मोहम्मद रिझवान ( ४), बाबर आजम ( ६) व शान मसूद ( २) हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले.  मोहम्मद हॅरीस व इफ्तिखार यांनी काही काळ डाव सावरला, परंतु हॅरिसच्या ( २८) रुपाने पाकिस्तानला ४३ धावांवर चौथा धक्का बसला.  मोहम्मद नवाजने २८ धावा केल्या आणि इफ्तिखारसह त्याने ३९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. इफ्तिखारही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. एनरिच नॉर्खियाने ४ विकेट्स घेतल्या. 

क्विंटन डी कॉक ( ०) व रिली रोसोवू ( ७ ) यांना शाहिन आफ्रिदीने माघारी पाठवल्यानंतर शादाब खानने मोठे धक्के दिले. टेम्बा बवुमाने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३६ धावा केल्या आणि २० धावा करणाऱ्या एडन मार्कराम यांना शादाबने माघारी पाठवल्याने आफ्रिकेची अवस्था ९ षटकांत ४ बाद ६९ अशी झाली. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका १६ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, या सामन्यात फॅनचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. त्यात त्याने पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचला तर ती आणि मी भांडणार नाही, असा मजकूर लिहिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्डपाकिस्तानद. आफ्रिका
Open in App