T20 World Cup PAK vs AUS: पाकिस्तानच्या पराभवानंतर वसीम जाफरनं शेअर केलं MEMES चं भंडार; फॅन्सनंही घेतली फिरकी

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final : ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:15 PM2021-11-12T16:15:39+5:302021-11-12T16:16:15+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup PAK vs AUS Wasim Jaffer shares MEMES after Pakistans defeat Fans also enjoyed | T20 World Cup PAK vs AUS: पाकिस्तानच्या पराभवानंतर वसीम जाफरनं शेअर केलं MEMES चं भंडार; फॅन्सनंही घेतली फिरकी

T20 World Cup PAK vs AUS: पाकिस्तानच्या पराभवानंतर वसीम जाफरनं शेअर केलं MEMES चं भंडार; फॅन्सनंही घेतली फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final : पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि मॅथ्यू वेड ( Matthew Wade) यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला. या सामन्यानंतर वसीम जाफरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक मीम्स शेअर केला. दरम्यान, फॅन्सनंही पाकिस्तानची यावरून फिरकी घेतली.

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरनं मीम्स शेअर केले. वसीम जाफर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. पाकिस्तान हा विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता. पण पहिल्याच पराभवानंतर पाकिस्तानला थेट बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला.



कर्णधार बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि फाखर जमान ( Fakhar Zaman) या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या.  पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या.  ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.
  
मॅथ्यू वेडव व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राखताना सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हसन अलीनं १८व्या षटकात १५ धावा दिल्या आणि आता ऑसींनी १२ चेंडूंत २२ धावा करायच्या होत्या. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण निर्माण झालं. अनुभवी फलंदाज शोएब अलीला धीर द्यायला धावला. पुढच्या चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

Web Title: T20 World Cup PAK vs AUS Wasim Jaffer shares MEMES after Pakistans defeat Fans also enjoyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.