Join us  

T20 World Cup, PAK vs AUS Live Update : ouch..! जगात भारी ठरला मोहम्मद रिझवान, पण मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरनं चुकवलेला काळजाचा ठोका

रिझवानला दोन जीवदान मिळाले. ऑसी गोलंदाजांची धुलाई होत असताना फिरकीपटू अ‍ॅडम झम्पानं प्रभावित केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 8:37 PM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : नाणेफेकीचा कौल विरोधात जाऊनही पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सकारात्मक सुरुवात केली. कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) मारलेला कव्हर ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मोहम्मद रिझवाननं ( Mohammad Rizwan) सावध सुरुवातीनंतर तुफान फटकेबाजी केली. त्यानं या सामन्यात वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवून थेट सचिन तेंडुलकरच्या पंक्तित स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करणारा संघ सर्वाधिकवेळा जिंकला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानवर दडपण येईल असे वाटत होते. पण, बाबरनं या परिस्थिला सामोरं जावं लागेल याचा अंदाज बांधूनच साखळी फेरीत एका सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आव्हान यशस्वी पेलले. त्यामुळे आजच्या सामन्यातही ते आत्मविश्वासानं उतरले. बाबरचा प्रत्येक फटका परफेक्ट होता. बाबर-रिझवान जोडी चोरटी धाव घेत ऑसी गोलंदाजांना हैराण करत होती. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रिझवाननं दाणपट्टा सुरू केला अन् चौकार-षटकार खेचले.

रिझवानला दोन जीवदान मिळाले. ऑसी गोलंदाजांची धुलाई होत असताना फिरकीपटू अ‍ॅडम झम्पानं प्रभावित केलं. त्यानं त्याच्या पहिल्या षटकात ४ धावा दिल्या. त्यानंतर १०व्या षटकात केवळ तीन धावा देत ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण विकेटही मिळवून दिली. अखेरच्या चेंडूवर बाबरनं टोलावलेला चेंडू लाँग ऑनला डेव्हिड वॉर्नरनं टिपला अन् पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३००+ धावा करणारा बाबर पहिला पाकिस्तानी खेळाडू व कर्णधार ठरला.

त्यानंतर रिझवाननं फटकेबाजी केली. झम्पाच्या पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचून त्यानं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १००० धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. कसोटीत असा पराक्रम २००६मध्ये मोहम्मद युसूफनं ( १७८८) आणि वन डे त १९९८मध्ये सचिन तेंडुलकरनं ( १८९४) केला होता.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App