T20 World Cup, OMNvPNG Live : पापुआ न्यू गिनी-ओमान सामन्यात घडला इतिहास, India-Pakistan यांच्या लढतीतही असं कधी झालं नाही!

OMAN V PAPUA NEW GUINEA : ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्यातल्या सामन्यानं T20 World Cup 2021 स्पर्धेला सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:34 PM2021-10-17T17:34:51+5:302021-10-17T17:35:51+5:30

T20 World Cup, OMNvPNG Live : First time a captain has scored a fifty and the opposing captain has taken a four-wicket haul in the same match in T20Is  | T20 World Cup, OMNvPNG Live : पापुआ न्यू गिनी-ओमान सामन्यात घडला इतिहास, India-Pakistan यांच्या लढतीतही असं कधी झालं नाही!

T20 World Cup, OMNvPNG Live : पापुआ न्यू गिनी-ओमान सामन्यात घडला इतिहास, India-Pakistan यांच्या लढतीतही असं कधी झालं नाही!

Next

OMAN V PAPUA NEW GUINEA : ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्यातल्या सामन्यानं T20 World Cup 2021 स्पर्धेला सुरुवात झाली. ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पपुआ न्यू गिनीनं अडखळत सुरुवातीनंतरही ९ बाद १२७ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात ओमान व पपुआ न्यू गिनीच्या कर्णधारांनी पहिल्याच डावात इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असा विक्रम प्रथमच झाला, अगदी India vs Pakistan यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यांत असा पराक्रम झालेला नाही आणि नजिकच्या भविष्यात होणेही अवघड आहे.


PNG चे दोन्ही सलामीवीर धावफलकावर दोन धावा असताना माघारी परतले. पहिल्या षटकात बिलाल खाननं PNGचा सलामीवीर टोनी उरा याचा त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात के कलीमुल्लाहनं PNGच्या लेगा स्लाकाची विकेट मिळवून २ बाद ० धावा अशी अवस्था केली. पण, कर्णधार अस्साद वाला व चार्ल्स आमिनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. संवांद चुकल्यानं आमिनी ३७ ( २६ चेंडूं, ४ चौकार व १ षटकार) धावांवर धावबाद झाला. अस्सादनं ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. 

डावाच्या १६व्या षटकात OMNचा कर्णधार झीशान मक्सूदनं तीन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर PNGनं २७ धावांत ६ फलंदाज गमावले आणि त्यांना २० षटकांत ९ बाद १२९ धावांवर समाधान मानावे लागले. झीशाननं २० धावांत ४  विकेट्स घेतल्या. बिलाल खान व के कलीमुल्लाह यांनी प्रत्येकी दोन बळी टीपले. ( What a comeback by Oman howler, PNG was 102 for 3 from 14 overs then to restrict them to 129 for 9 from 20 overs - 4 wickets by Zeeshan Maqsood, 2 wickets each by Bilal and Kaleemullah) 

PNG चा कर्णधार अस्साद वालाच्या (Asad Vala)  ५६ धावा आणि Omanचा कर्णधार झीशान मक्सूद ( Zeeshan Maqsood) याच्या चार विकेट्स यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात एकाच सामन्यात एका संघाच्या कर्णधाराचे अर्धशतक व प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या चार विकेट्स असा पराक्रम प्रथमच घडला. ( First time a captain has scored a fifty and the opposing captain has taken a four-wicket haul in the same match in T20Is) 

Web Title: T20 World Cup, OMNvPNG Live : First time a captain has scored a fifty and the opposing captain has taken a four-wicket haul in the same match in T20Is 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app