Join us  

Big News : ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022पर्यंत स्थगित होणार?; ICCच्या सूत्रांची माहिती

आयसीसीच्या सूत्रांचे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:06 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती, परंतु सद्यपरिस्थिती पाहता वर्ल्ड कप होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. 28 मे ला होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात ही बैठक होणार असून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 2022पर्यंत स्थगित करण्यात येईल, असे संकेत आयसीसीच्या सूत्रांनी दिले आहेत.

''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याची शक्यता अधिक आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. सद्यस्थितित ही स्पर्धा होण्याची फार तुरळक शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि अन्य मंडळांना या निर्णयाचं आश्चर्य वाटणार नाही,''असे आयसीसीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. 

तीन पर्यायांवर होणार चर्चा

  • ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2021मध्ये फेब्रुवारी- मार्चमध्ये आयोजित केली जाऊ शकते, परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यासाठी तयार नाही. कारण लगेचच आयपीएल स्पर्धा आहेत आणि सलग 3-4 महिने ट्वेंटी-20 खेळून खेळाडूंची हालत खराब होऊ शकते. अशात भारताचा इंग्लंड दौराही आहे.  
  • 2021मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआय या वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला दिल्यास आणि 2022च्या वर्ल्ड कप आयोजन बीसीसीआयला दिल्यास. पण, बीसीसीआय त्यासाठी तयार नाही. 
  • ऑस्ट्रेलियात होणारा यंदाचा वर्ल्ड कप दोन वर्षांसाठी पुढे ढकलला जावा आणि 2022मध्ये ऑस्ट्रेलियाला यजमानपद देण्यात यावं.  

 

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा 

शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा

Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

टॅग्स :आयसीसीआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020कोरोना वायरस बातम्या