Join us  

India vs Pakistan : MS Dhoni ला पाहताच पाकिस्तानी गोलंदाज सराव सोडून मारू लागला गप्पा, म्हणाला... Video

India vs Pakistan या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असले तरी पाकिस्तानातही विराट व धोनीचे फॅन्स आहेत. पाकिस्तानच्या संघातही महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे आणि धोनीला पाहताच तो सराव सोडून गप्पा मारू लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:02 PM

Open in App

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या महामुकाबल्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पाकिस्ताननं या सामन्यासाठी युवा व अनुभवी खेळाडूंची सांगड घालताना १२ शिलेदार जाहीर केले. टीम इंडियानं त्यांची प्लेइंग इलेव्हन गुलदस्त्यात ठेवली असली तरी उद्या कोण कोण खेळतील, याचा अंदाज सर्वांना आहेच. या लढतीपूर्वी दोन्ही संघांनी शनिवारी आयसीसीच्या अकादमीत कसून सराव केला. टीम इंडियाचे सराव सत्र संपल्यानंतर पाकिस्तानचा संघ सरावाला लागला. या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असले तरी पाकिस्तानातही विराट व  धोनीचे फॅन्स आहेत. पाकिस्तानच्या संघातही महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे आणि धोनीला पाहताच तो सराव सोडून गप्पा मारू लागला.

पाकिस्तानचा गोलंदाज  शाहनवाज दहानी ( Pakistan pacer Shahnawaz Dahani) यानं PSL 2021 गाजवताना पाकिस्तानच्या संघात स्थान पटकावले. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि मेंटॉर धोनी समोर दिसताच शाहनवाजला त्याचा आनंद लपवता आला नाही. टीम इंडियाच्या बसच्या दिशेनं जात असलेल्या धोनीसोबत तो गप्पा मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. यावेळी शाहनवाजनं धोनीला तू अजून तंदुरुस्त दिसतोय, असे म्हटले. त्यावर धोनी म्हणाला, मी आता म्हातारा झालोय. पण, त्यावर पाकिस्तानी गोलंदाजाचे लगेच उत्तर आले, नाही, तू आधीपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसतोय.

पाहा व्हायरल व्हिडीओ...   नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान सुल्तान संघाकडून खेळणाऱ्या शाहनवाजनं ११ सामन्यांत सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या आहेत.   

टीम इंडियाला आव्हान देणारे शिलेदार पाकिस्ताननं केले जाहीर; युवा व अनुभवी खेळाडूंची घातलीय सांगड

Pakistan Playing XI vs India  : बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसीफ अली, हैदर अली, इमाद वासीम, शाबाद खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ ( Pakistan Playing XI vs India  : Babar Azam (C), Rizwan, Fakhar Zaman, Hafeez, Malik, Asif Ali, Haider Ali, Imad Wasim, Shadab Khan, Hasan Ali, Shaheen, Haris Rauf)

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानमहेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्ड
Open in App