Join us

T20 World Cup, India vs Pakistan : Hardik Pandyaनं सायंकाळच्या सराव सत्राला मारली दांडी; पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत संभ्रम!

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियानं सायंकाळच्या सत्रात अतिरिक्त सराव सत्र आयोजित केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 23:10 IST

Open in App

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियानं सायंकाळच्या सत्रात अतिरिक्त सराव सत्र आयोजित केले होते. त्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं सहभाग घेतला नाही, तर प्रमुख  गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. विराट कोहली, लोकेश राहुल, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी नेट्समध्ये खूप घाम गाळला. रिषभ पंत, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर यांनीही कसून सराव केला, परंतु इशान किशनही गैरहजर होता. टीम इंडियाच्या सर्व गोलंदाजांनी सराव सत्रात सहभाग घेतला. जसप्रीतनं धोनीकडून काही टिप्स घेतल्या.     हार्दिक पांड्याविषयी काय म्हणाला कोहली?''हार्दिक पांड्या आता तंदुरुस्त आहे आणि तो किमान दोन षटकं नक्की टाकेल. त्यामुळे काही षटकं टाकण्यासाठी आम्ही दुसरा पर्यायाचाही विचार करत आहोत. मी नेहमीच त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून पाहिले आणि पाठींबा दिला आणि तेच आताही करू. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे आणि काही षटकं फेकण्यासाठी तो तयार आहे,''असे विराटनं स्पष्ट केलं.

असा असू शकतो संभाव्य संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या/शार्दूल ठाकूर, आर अश्विन/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार/वरुण चक्रवर्थी 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीहार्दिक पांड्या
Open in App