Join us

T20 World Cup: पत्नी नताशासोबत Hardik Pandyaचा रोमँटिक डान्स; Video Viral

हार्दिकनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:56 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं पत्नी नताशा स्टँकोव्हिच सोबत रोमँटिक डान्स केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. हार्दिकनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.   

हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती ठरतेय डोकेदुखीट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCIनं संघ जाहीर करताच टीम इंडियातील खेळाडूंच्या आयपीएल २०२१मधील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा गेम चेंजर असल्याचा दावा होत होता. पण, हार्दिकची तंदुरुस्ती ही चिंता वाढवणारी ठरतेय. आयपीएलमध्येही त्यानं गोलंदाजी केली नाहीच, शिवाय फलंदाजीतही काही छाप पाडू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यातही पांड्यानं गोलंदाजी केली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्याच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा खूप वेगळी ठरणार असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी विना खेळणार आहोत. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर असून माझ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे आव्हान आहे,’ असे मत भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने व्यक्त केले.

टॅग्स :हार्दिक पांड्याट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App