Join us  

T20 World Cup final, NZ vs AUS : न्यूझीलंडचे खेळाडू 'ग्रेट' का आहेत, हे फोटोनं पुन्हा एकदा सिद्ध केलं; डेव्हॉन कॉनवे हात मोडूनही करतोय सहकाऱ्यांना मदत

T20 World Cup final, NZ vs AUS : आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करून नवा इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 4:20 PM

Open in App

T20 World Cup final, NZ vs AUS : आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करून नवा इतिहास रचण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. केन विलियम्सच्या  नेतृत्वाखाली हा संघ दिवसेंदिवस हॉट फेव्हरिट होत चालला आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपचे उपविजेतेपद, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी न्यूझीलंडचे खेळाडू कसून तयारी करत आहेत. उपांत्य फेरीत  इंग्लंडला पराभूत  केल्यानंतर आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास ते तयार आहेत. प्रत्येक संघात १-२ स्टार खेळाडू असतात, परंतु किवींचा विचार केल्यास इथे सर्वच खेळाडू स्टार आहेत. त्यामुळेच कोणत्या सामन्यात कोणता स्टार चमकेल, याचा नेम बांधणे भल्याभल्यांना अवघड गेलेय... त्यात त्यांच्या खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे सारेच कौतुक करतात. याची प्रचिती देणारा एक प्रसंग पुन्हा घडला आहे.

फायनलपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आणि त्यांचा यष्टिरक्षक-फलंदाज डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. पण, कॉनवे मोडलेला हात घेऊन सहकाऱ्यांसह सरावा सत्रात सहभागी झाला आहे. आपल्या संघाला पहिलं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात तोही हातभार लावत आहे. एका हाताला बँडेज लावून मैदानावर उतरलेला कॉनवे सहकारी टीम सेईफर्ट यासा ड्रिल्समध्ये सहकार्य करतोय. फायनलमध्ये सेईफर्ट यष्टिंमागे दिसण्याची शक्यता अधिक आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं कॉनवेचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध बाद झाल्यानंतर कॉनवेनं त्याचा हात जोरदार बॅटवर मारला. त्यानंतर त्याला वर्ल्ड कप स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्यानं  या वर्ल्ड कप मध्ये ६ सामन्यात ३२.२५च्या सरासहीनं १२९ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्यानं ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१न्यूझीलंडआॅस्ट्रेलिया
Open in App