T20 World Cup, England vs Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकिट पक्के केले आहे. पण, दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया शर्यतीत आहेत. इंग्लंडने आज श्रीलंकेचा पराभव केल्यास, ऑस्ट्रेलियाचे पॅकअप निश्चित आहे. पण, इंग्लंड गतविजेता ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल. त्यामुळे आजच्या सामन्यात श्रीलंकेने तणावमुक्त खेळ केला. पथूम निसंकाने ( Pathum Nissanka) केलेली फटकेबाजी पाहून इंग्लंडचे तणाव वाढवले. इंग्लंडच्या सेमीफायनलच्या मार्गात चांगले आव्हान उभे केले.
BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी शाहिद आफ्रिदीचा घेतला समाचार; पाकिस्तानी खेळाडूची बोलती बंद
पथूम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी सुरुवात तर तशीच केली. यंदाच्या स्पर्धेत सर्वात वेगवान मारा करणाऱ्या मार्क वूडला या दोघांनी चोपून काढले. चौथ्या षटकात ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात मेंडिस ( १८) झेलबाद झाला. लिएम लिव्हिंगस्टोनने अप्रतिम झेल टिपला. पण, निसंका काही थांबता थांबेना आणि त्याने सॅम कुरनच्या पुढील षटकात चौकार-षटकार खेचले. निसंकाची फटकेबाजी सुरू असताना धनंजया डी सिल्वा दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करत होता, परंतु ९ धावांवर त्याला कुरनने बाद केले.
निसंकाचे वादळ काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. इंग्लंडची डोकेदुखी वाढत असताना डेवीड मलानला मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. भानुका राजपक्षाने मारलेला अपरकट जबरदस्त होता. १६व्या षटकात निसंकाची विकेट मिळवण्यात इंग्लंडला यश आले. आदील राशिदच्या गोलंदाजीवर निसंकाने खणखणीत षटका मारला अन् मलानच्या जागी क्षेत्ररक्षणाला आलेल्या ख्रिस जॉर्डनने सुरेख झेल घेतला. निसंका ४५ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांवर बाद झाला. निसंकाच्या विकेटनंतर इंग्लंडने कमबॅक केले आणि श्रीलंकेला धक्के दिले. श्रीलंकेला ८ बाद १४१ धावांपर्यंत मजल मारता आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"