T20 World Cup, ENG vs NZ  Semi Final Live Updates : तेव्हा ट्रेंट बोल्ट अन् आज जॉनी बेअरस्टो; दोन झेल ज्यांनी बदलले सामन्याचे चित्र, जाणून घ्या योगायोग विचित्र 

T20 World Cup, England vs New Zealand Semi Final Live Updates : न्यूझीलंड संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अखेरच्या २४ चेंडूत ५७ धावांची गरज असताना सहा चेंडू हातचे राखून इंग्लंडला स्पर्धेबाहेर केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:39 PM2021-11-10T23:39:10+5:302021-11-10T23:46:19+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, ENG vs NZ Semi Final Live Updates : Trent Boult in 2019 and Johnny Bairstow in 2021, Two catches that turned the match | T20 World Cup, ENG vs NZ  Semi Final Live Updates : तेव्हा ट्रेंट बोल्ट अन् आज जॉनी बेअरस्टो; दोन झेल ज्यांनी बदलले सामन्याचे चित्र, जाणून घ्या योगायोग विचित्र 

T20 World Cup, ENG vs NZ  Semi Final Live Updates : तेव्हा ट्रेंट बोल्ट अन् आज जॉनी बेअरस्टो; दोन झेल ज्यांनी बदलले सामन्याचे चित्र, जाणून घ्या योगायोग विचित्र 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, England vs New Zealand Semi Final Live Updates : न्यूझीलंड संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अखेरच्या २४ चेंडूत ५७ धावांची गरज असताना सहा चेंडू हातचे राखून इंग्लंडला स्पर्धेबाहेर केलं. या विजयासह न्यूझीलंडनं २०१९मध्ये वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला. दोन वर्षांपूर्वी बेन स्टोक्सनं टोलावलेला चेंडू ट्रेंट बोल्टला सीमारेषेवर पकडण्यात अपयश आलं अन् इंग्लंडला सहा धावा मिळाल्या. तो झेल  न्यूझीलंडला महागात पडला होता. आज तसाच झेल जॉनी बेअरस्टोकडून टीपला गेला, परंतु त्याचा पाच सीमारेषेला टच झाला आणि इंग्लंडच्या हातून सामना निसटला. 

केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून डेविड मलाननं ३० चेंडूंत ४१ धावा कुटल्या.  मोईन अलीनं फटकेबाजीला करतानाला मलानसह तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. अली व लिएम लिव्हिंगस्टोननं धावांचा वेग वाढवताना चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४० धावा कुटल्या. अलीनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.  अली ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं ४ बाद १६६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा मार्टीन गुप्तील ( ४) व कर्णधार केन ( ५) यांना अवघ्या १३व्या धावांवर ख्रिस वोक्सनं माघारी पाठवले. डॅरील मिचेल व डेव्हॉन कॉनवे यांनी संयमी सुरुवातीनंतर किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कॉनवे ३८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला.  किवींना २४ चेंडूंत ५७ धावा करायच्या होत्या आणि आता त्यांना चमत्कारच वाचवू शकत होता. जिमि निशॅमनं ख्रिस जॉर्डननं टाकलेल्या १७व्या षटकात २६ धावा कुटल्या फटकेबाजी केली. या स्पर्धेतील इंग्लंडकडून पडलेलं हे सर्वात महागडं षटक ठरलं. त्यानं १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावा चोपून त्याची कामगिरी चोख बजावली.  मिचेल ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. न्यूझीलंडनं ५ विकेट व १ षटक राखून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

ख्रिस जॉर्डननं टाकलेल्या १७व्या षटकात त्यानं फटकेबाजी केली. चौथ्या चेंडूवर निशॅमनं टोलावलेला चेंडू सीमारेषेवर जॉनी बेअरस्टोनं टिपला अन् तोल जाण्यापूर्वी तो सहकारी खेळाडूकडे फेकला. पण, चेंडू हातातून सोडण्याआधी त्याचा पाय सीमारेषेला टेकला व किवींना ६ धावा मिळाल्या. 
 

Web Title: T20 World Cup, ENG vs NZ Semi Final Live Updates : Trent Boult in 2019 and Johnny Bairstow in 2021, Two catches that turned the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.