Join us

T20 World Cup, #Ban Pak Cricket : का होतेय India-Pakistan सामन्यावर बहिष्काराची मागणी?

#Ban Pak Cricket Trends : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे, परंतु सर्वांना उत्सुकता लागलीय ती २४ ऑक्टोबरची. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 15:10 IST

Open in App

#Ban Pak Cricket Trends : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे, परंतु सर्वांना उत्सुकता लागलीय ती २४ ऑक्टोबरची. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. पण, या सामन्यावर टीम इंडियानं बहिष्कार टाकावा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. आज सोशल मीडियावर  #ban_pak_cricket हा ट्रेंड सुरू आहे आणि त्यामागे कारणही आहे. जम्मू-काश्मीर येथील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत मागील ७ दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मागील आठवड्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवान शहीद झाले आणि अजूनही भारतीय सैन्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे टीम इंडियानं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत आहे. TV9 भारतवर्ष चॅनेलशी बोलताना शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांनी, शहीदांपेक्षा क्रिकेट महत्त्वाचं नाही, असे मत मांडले. नेटिझन्स काय म्हणतात ते पाहा?

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानजम्मू-काश्मीरदहशतवादी
Open in App