Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 1st Semi Final : ठरलं! द.आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमीफानयल; कधी अन् कुठ रंगणार सामना?

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 19:43 IST

Open in App

T20 World Cup 1st Semi Final : दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध विजय नोंदवत पहिल्या गटातून विजयी हॅटट्रिकसह अव्वलस्थान पक्के केले. या विजयासह यंदाच्या हंगामातील पहिल्या सेमीफायनलच चित्र स्पष्ट झालं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या सेमीफायलमध्ये दुसऱ्या गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. इथं जाणून घेऊयात कधी अन् कुठं रंगणार ही पहिली सेमीफायनल? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

कधी अन् कुठं रंगणार पहिल्या सेमीफायनलचा थरार?

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमधील लढत कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येईल. ४ मार्च, २०२६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे. गत उपविजेता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रत्येक सामना जिंकत पुन्हा एकदा फायनल खेळण्याची दावेदारी भक्कम केली आहे. दुसरीकडे काठावर पास झालेल्या न्यूझीलंडच्या संघासमोर अपराजित दक्षिण आफ्रिकेला थोपवण्याचे मोठे चॅलेंज असेल.  

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या मैदानता सुपर ८ फेरीतील अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील विजता दुसऱ्या सेमीफायलमध्ये इंग्लंडला भिडेल. कारण इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या गटात अव्वलस्थानी आहे. ही लढत ५ मार्च, २०२६ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: South Africa vs. New Zealand in First Semifinal!

Web Summary : South Africa secured a semifinal spot after defeating Zimbabwe. They will face New Zealand in Kolkata on March 4, 2026. The winner of India vs. West Indies will play England in Mumbai on March 5 for the second semifinal.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६द. आफ्रिकान्यूझीलंड