Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC 2026: किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानकडे मोठी संधी!

Sahibzada Farhan: पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान याच्याकडे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 08:55 IST

Open in App

सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान आपल्या बॅटने आग ओकत आहे. सुपर ८ टप्प्यातील चुरस वाढली असतानाच, फरहानकडे आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

साहिबजादा फरहानने चालू विश्वचषकात आतापर्यंत ५ डावांमध्ये २८३ धावा कुटल्या आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने ३१९ धावा करून एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम मोडण्यासाठी फरहानला आता केवळ ३७ धावांची गरज आहे. २८ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जर फरहानने या धावा केल्या, तर तो टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल.

एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:

क्रमांकखेळाडूदेशधावावर्ष
विराट कोहलीभारत३१९२०१४
तिलकरत्ने दिलशानश्रीलंका३१७२००९
बाबर आझमपाकिस्तान३०३२०२१
४ महेला जयवर्धनेश्रीलंका३०२२०१०
साहिबजादा फरहानपाकिस्तान२८३२०२६

नुकत्याच पल्लेकेले येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फरहानने ६३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या अर्धशतकामुळे पाकिस्तानने १६४ धावांचे आव्हान उभे केले. मात्र, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने अवघ्या ५१ चेंडूत शतक झळकावून पाकिस्तानच्या हातातून विजय हिसकावून घेतला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली असून, असा पराक्रम करणारा तो चालू स्पर्धेतील पहिला संघ ठरला आहे.

इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग आता खडतर झाला आहे. उर्वरित तीन स्थानांसाठी इतर संघांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. २८ फेब्रुवारीला होणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा असून, सर्वांच्या नजरा साहिबजादा फरहानच्या फलंदाजीवर आणि तो विराटचा विक्रम मोडतो का, यावर खिळल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 WC 2026: Sahibzada Farhan eyes Kohli's record in World Cup.

Web Summary : Pakistan's Sahibzada Farhan is close to breaking Virat Kohli's record for most runs in a single T20 World Cup. With 283 runs already, he needs just 37 more against Sri Lanka to surpass Kohli's 319. England's win over Pakistan has complicated Pakistan's semi-final chances.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६विराट कोहलीपाकिस्तानऑफ द फिल्ड