Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 स्पर्धेत यजमान संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

Wanindu Hasaranga Ruled out T20 World Cup 2026: सलामीच्या सामन्यात केली होती धडाकेबाज कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:44 IST

Open in App

Wanindu Hasaranga Ruled out T20 World Cup 2026: टी२० विश्वचषक २०२६ चा सह-यजमान असलेल्या श्रीलंकन संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू आणि मॅचविनर अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला 'हॅमस्ट्रिंग'च्या (Hamstring) गंभीर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. हसरंगाला ही दुखापत आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात झाली होती. त्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले होते आणि श्रीलंकेला २० धावांनी विजय मिळवून दिला होता. मात्र, गोलंदाजी दरम्यानच त्याला त्रास जाणवू लागला होता. अखेर त्याने स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

MRI रिपोर्टमध्ये काय खुलासा?

मंगळवारी करण्यात आलेल्या एमआरआय (MRI) स्कॅनमध्ये त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये मोठी 'टीअर' (Tear) असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुखापत गंभीर असल्याने त्याला सावरण्यासाठी अनेक आठवडे लागणार आहेत. हसरंगा हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. घरच्या मैदानावरील फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर तो श्रीलंकेचे सर्वात मोठे शस्त्र होता, परंतु आता यजमानांना त्याच्याविनाच पुढील प्रवास करावा लागेल.

बदली खेळाडूची घोषणा?

वानिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकन संघात लेग-स्पिनर दुषण हेमंथा (Dushan Hemantha) याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. हेमंथा हा देखील एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, तांत्रिक समितीच्या मंजुरीनंतर ही बदली अधिकृत केली जाईल. हसरंगाच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणाची मदार आता महीश तीक्षणा आणि वानिंदूच्या जागी येणाऱ्या युवा खेळाडूंवर असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Sri Lanka's Hasaranga Out of T20 World Cup 2026 Due Injury

Web Summary : A major blow for Sri Lanka! Wanindu Hasaranga is ruled out of the T20 World Cup 2026 due to a hamstring injury sustained during the match against Ireland. MRI reveals a significant tear, sidelining him for weeks. Dushan Hemantha is likely replacement for the team.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६श्रीलंकाऑफ द फिल्ड