IND vs ENG : संजूचा 'तो' इशारा अभिषेक शर्माला नाही कळला! मग पुन्हा तेच घडलं (VIDEO)

पाचव्या डावात तिसऱ्यांदा ऑफ स्पिनरसमोर बाद होण्याची नामुष्की ओढावली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:42 IST2026-03-05T19:37:33+5:302026-03-05T19:42:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T20 World Cup 2026 Abhishek Sharma Ignore Sanju Samson Advice Departs Cheaply At Wankhede vs Will Jacks India vs England, 2nd Semi Final | IND vs ENG : संजूचा 'तो' इशारा अभिषेक शर्माला नाही कळला! मग पुन्हा तेच घडलं (VIDEO)

IND vs ENG : संजूचा 'तो' इशारा अभिषेक शर्माला नाही कळला! मग पुन्हा तेच घडलं (VIDEO)

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अभिषेक शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात माघारी फिरला. संजू सॅमसनसोबत डावाला सुरुवात केल्यावर त्याने  दोन खणखणीत चौकार मारले. पण दुसऱ्या षटकात विल जॅक्स आला अन् टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा अभिषेक शर्मा ऑफ स्पिनरच्या जाळ्यात अडकला. दुसऱ्या षटकातील अखेरच्या षटकात मोठा फटका खरण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. फिल सॉल्टनं सोपा झेल टिपत अभिषेक शर्माला ९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.

 

अभिषेक शर्मा यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्याने फिरकीसमोर फसला आहे. विकेट गमावण्याआधी त्याने विल जॅक्सला एक चौकार मारला. हा फटका मारल्यावर संजूनं त्याला स्वत:वर नियंत्रण ठेवत शांत खेळण्याचा इशारा केला होता. संजूनं हातवारे इशारा करत त्याला संयमी खेळी करण्याचा सल्ला दिला खरा. पण त्याला ते काही कळलेच नाही. विल जॅक्सच्या चेंडूवर तो पुढे येऊन फटका मारायला गेला. जॅक्सनं त्याची चाल ओळखून त्याच्या पायावर चेंडू टाकला. परिणामी त्याला तो फटका सीमारेषेबाहेर घालवता आला नाही.  त्याच्यावर  पाचव्या डावात तिसऱ्यांदा ऑफ स्पिनरसमोर बाद होण्याची नामुष्की ओढावली. 

Web Title : IND vs ENG: संजू का इशारा छूटा, अभिषेक शर्मा सस्ते में आउट।

Web Summary : इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल में, अभिषेक शर्मा एक आशाजनक शुरुआत के बाद सस्ते में आउट हो गए। संजू सैमसन ने सावधानी बरतने की सलाह दी, लेकिन शर्मा एक ऑफ-स्पिनर का शिकार हो गए और केवल 9 रन पर अपना विकेट गंवा बैठे।

Web Title : IND vs ENG: Sanju's hint missed, Abhishek Sharma falls cheaply.

Web Summary : In the semi-final against England, Abhishek Sharma fell cheaply after a promising start. Sanju Samson advised caution, but Sharma succumbed to an off-spinner, gifting his wicket away for just 9 runs.