Join us

T20 WC 24 : पाकिस्तानी संघाने चाहत्यांकडून केली वसूली; खेळाडूंना भेटण्यासाठी घेतली मोठी रक्कम

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:06 IST

Open in App

Pakistani Players Private Dinner 25 Dollar : सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. विश्वचषकातील सलामीचा सामना खेळण्यापूर्वीच पाकिस्तानी संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. माहितीनुसार, पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंसोबत 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी २५ डॉलर एवढे शुल्क आकारण्यात आले होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने या घटनेचा दाखला देत संघ व्यवस्थापनाला फटकारले. 

एका कार्यक्रमात बोलताना त्याने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. या कार्यक्रमात सहभागी झालेले इतरही पाहुणे संतापलेले दिसले आणि त्याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सुनावले. राशिद लतीफ म्हणाला की, अधिकृत डिनर असतात, पण हा खासगी डिनर आहे. हे कोण करू शकते? हे खूपच भयंकर प्रकरण आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्या खेळाडूंना २५ डॉलर्स एवढी रक्कम देऊन भेटलात. असे होऊ नये पण जर खेळाडूंच्या या कार्यक्रमात काही गडबड झाली असती तर लोक बोलले असते की ते पैशांसाठी सर्वकाही करत आहेत. 

राशिद लतीफने आणखी सांगितले की, तुम्ही दोन ते तीन डिनरला जाता. तुम्ही चॅरिटी डिनर आणि फंड रेझिंग प्रोग्रामला जाऊ शकता, पण हे ना फंड रेझिंग आहे ना चॅरिटी डिनर. हे पाकिस्तान आणि पाकिस्तानी क्रिकेटच्या नावावर आहे. यामाध्यमातून केवळ पैसा कमावला जात आहे. कृपया करून अशी चूक पुन्हा करू नका.

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील

टॅग्स :पाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेट