Join us

रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांनाच उत्सुकता आहे. ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये हा सामना रंगणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 18:55 IST

Open in App

T20 World Cup 2024 IND vs PAK : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांनाच उत्सुकता आहे. ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये हा सामना रंगणार आहे आणि हजारोंच्या संख्येने चाहते या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही संघासाठी अमेरिकेकडून सुरक्षारक्षकांची फौज उभी केली आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे, कारण पाकिस्तानला यजमान अमेरिकेकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे टीम इंडियाने त्यांच्या सलामीच्या सामन्यात आयर्लंडवर मात केली आहे.

पाकिस्तानचा संघ कालच न्यू यॉर्क येथे दाखल झाला आणि त्यांनी सराव सत्रात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून हार पत्करावी लागल्याने पाकिस्तानी खेळाडूंचे मनोबल प्रचंड खचलेले पाहायला मिळतेय. काही खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये ढसाढसा रडल्याचे पाकिस्तानी मीडियाने वृत्त दिले आहे. पाकिस्तानी खेळाडू बाबर आजमच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळले असल्याचाही दावा काही मीडियाने केला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदी न्यू यॉर्कमध्ये फेरफटका मारताना दिसला आणि त्याला भारतीय चाहत्यांनी घेरले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय चाहते शाहीनशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. यात एक चाहता शाहीनला म्हणाला की, रोहित आणि विराट यांना तू आपला चांगले मित्र समज... त्यावर शाहीन असला. पाण्याच्या कारंज्यासमोर हे चाहते शाहीनसोबत फोटो काढत होते. त्यात एक जण गमतीने म्हणाला, याला पाण्यात फेका... 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तानऑफ द फिल्ड