T20 World Cup 2024 ENG vs NAM Live - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाचे वर्चस्व पाहायला मिळतेय आणि याचा फटका पाकिस्तानला बसलेला दिसला. आता गतविजेत्या इंग्लंडची वाट लागलेली पाहायला मिळतेय, कारण अँटिग्वा येथे जोरदार पाऊस सुरू आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल, हे जाणून घ्या...
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव अन् स्कॉटलंडविरुद्ध १ गुणावर समाधान मानावे लागल्याने गतविजेत्या
इंग्लंडचे Super 8 मध्या जाण्याच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने ब गटातील तिसऱ्या लढतीत ओमानवर १९ चेंडूंत विजय मिळवून नेट रन रेट ३.०८१ इतका जबरदस्त केला. त्यामुळे आज नामिबियाविरुद्धच्या लढतीतील विजय त्यांना सुपर ८ मध्ये घेऊन जाऊ शकतो. कारण, ५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्कॉटलंड अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. इंग्लंड-नामिबिया सामना अँटिग्वा येथे होणार आहे, परंतु तिथेही पावसाने बॅटिंग सुरू केल्याने गतविजेत्यांची अवस्था वाईट झाली आहे.
ब गटातून ऑस्ट्रेलियाने सलग तीन विजय मिळवून सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. स्कॉटलंड ५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंड ३ गुणांसह तिसऱ्या. आजचा सामना रद्द झाल्यास इंग्लंड व नामिबिया यांना प्रत्येकी १ गुण मिळतील. ज्यामुळे इंग्लंड ( ४) सुपर ८च्या शर्यतीतून बाद होतील आणि स्कॉटलंड सुपर ८ मध्ये प्रवेश करून इतिहास घडवतील.