Join us

T20 World Cup 2022: जेतेपद इंग्लंडच्या फुटबॉलसाठी प्रेरणादायी ठरेल : बटलर

T20 World Cup 2022: टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद फिफा विश्वचषकात इंग्लंडच्या फुटबॉलसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 06:41 IST

Open in App

मेलबोर्न : टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद फिफा विश्वचषकात इंग्लंडच्या फुटबॉलसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने व्यक्त केला. कर्णधार म्हणून बटलरचा हा पहिलाच विश्वचषक आहे.पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी  पत्रकारांनी विचारले की, तुमच्या जेतेपदामुळे देशाच्या फुटबॉल संघाला प्रेरणा लाभेल काय? यावर जोस म्हणाला, ‘निश्चितच! मलादेखील हीच अपेक्षा आहे. इंग्लिश संस्कृतीत  खेळाला मोठे महत्त्व आहे. विश्वचषकात संघांना पाठिंबा देणे इंग्लंडमध्ये नेहमीचे असते. आम्हाला किती पाठिंबा मिळतो, हे आपणही अनुभवू शकता.’ इंग्लंड संघ फिफा विश्वचषकाच्या ब गटात इराण, वेल्स आणि अमेरिकेसोबत आहे. 

टॅग्स :जोस बटलरइंग्लंडट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App