Join us

SCOT vs WI Live : ६५ धावा ९ विकेट्स! वेस्ट इंडिजही 'लिंबू टिंबू' संघाकडून हरला; दोन वेळच्या विजेत्यांचे वस्त्रहरण

T20 World Cup 2022, Scotland vs West Indies Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक निकालाचे सत्र दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:51 IST

Open in App

T20 World Cup 2022, Scotland vs West Indies Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक निकालाचे सत्र दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या फेरीत नामिबियाने आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला पराभूत केले. आज स्कॉटलंड सारख्या लिंबू टिंबू संघाकडून दोन वेळा वर्ल्ड कप उंचावणारा वेस्ट इंडिजचा संघ हरला. जॉर्ज मुन्सी ( George Munsey ) याने फलंदाजीत, तर मार्क वॅट ( Mark Watt) गोलंदाजीत कमाल दाखवताना विंडीजला पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ५ बाद १६० धावा केल्या. सलामीवीर जॉर्न मुन्सीने ५३ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. मिचेल जेम्सन ( २०), कॅलम मॅकलीओड ( २३), कर्णधार रिची बेरींगहॅम ( १६) व ख्रिस ग्रेव्हीस  १६*) यांनीही योगदान दिले. विंडीजच्या अल्झारी जोसेफ ( २-२८) व जेसन होल्डर ( २-१४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. विंडीज हे माफक लक्ष्य सहज पार करेल असे वाटत असताना स्कॉटलंडने आश्चर्याचा धक्का दिला. कायले मेयर्स ( २०) व एव्हिन लुईस ( १४) हे सलामीवीर अपयशी ठरले. त्यानंतर मार्क वॅट व ब्रॅड विल यांनी धक्क्यांमागून धक्के दिले.

५३ धावांवर विंडीजची दुसरी विकेट पडली आणि पुढे ११८ धावांत संघ तंबूत परतला .जेसन होल्डरने ३८ धावा करून अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. वॅटने तीन, विल व मिचेल लिस्कने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जोश डॅव्ही व साफियान शरीफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. स्कॉटलंडने ४२ धावांनी सामना जिंकला. विंडीजने 9 विकेट्स 65 धावांत गमावल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२वेस्ट इंडिज
Open in App