Join us  

T20 World Cup, Hardik Pandya: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप आधीच टीम इंडियासाठी वाईट बातमी, हार्दिक पंड्या संघाबाहेर होण्याचा धोका!

T20 World Cup 2021: भारतीय संघासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा 'मॅच विनर' खेळाडू हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नाही आणि त्याचा फॉर्म देखील चांगला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:42 PM

Open in App

T20 World Cup 2021: यूएई आणि ओमानमध्ये पुढच्या महिन्यात आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेकडे वर्ल्डकप स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती आणि क्रिकेट बोर्डाचं बारकाईनं लक्ष आहे. १७ ऑक्टोबरपासून ट्वे्न्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि त्याआधीच भारतीय संघासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा 'मॅच विनर' खेळाडू हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नाही आणि त्याचा फॉर्म देखील चांगला नाहीय. त्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. 

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात, 'या' खेळाडूंची नावं चर्चेत!

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरणारा अष्टपैलू खेळाडू आहे. ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला सामना जिंकण्यासाठी विस्फोटक अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असते आणि हार्दिक पंड्यामध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. अशाचत तो फिट नसणं भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतं. 

धोनीच्या CSK संघाला कसं पराभूत करता येईल? सेहवागनं दिला 'कानमंत्र'!

यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सकडून पहिल्या दोन सामन्यांत हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली होती. तर तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला होता. याशिवाय या सामन्यात त्यानं गोलंदाजी देखील केली नाही. त्यामुळे महिनाभराच्या अंतरावर असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या गोलंदाजी करु शकेल का याबाबत साशंकता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक पंड्यानं गोलंदाजी केलेली नाही. पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्यावर खूप मर्यादा आल्या आहेत. 

VIDEO: चहलनं ड्रेसिंग रुममध्ये 'कॉपी' केली मॅक्सवेलनं टिपलेल्या झेलची 'स्टाईल', 'असं' झालं सेलिब्रेशन!

हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नाही याची कल्पना असूनही निवड समितीनं त्याला भारतीय संघात स्थान दिलं आहे. कारण त्याचं संघात असणं फार महत्त्वाचं आहे. पण हार्दिक पंड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्यानं आता भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. हार्दिक पंड्या अनफिट असल्यामुळे त्याच्या जागी आता शार्दुल ठाकूरचा विचार केला जात आहे. हार्दिकच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिल्यास त्याला संघाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघासाठी शार्दुल ठाकूर एक उत्तम अष्टपैलू म्हणून पर्याय दिसू लागला आहे. 

इशान किशनमुळे रोहित शर्मा दुखपातग्रस्त झाला; मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला, Watch Video 

हार्दिक पंड्याला अनफिट असल्यामुळे संघाबाहेर जावं लागलं तर त्याच्या जागी शार्दुल ठाकूर याचा समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. शार्दुलनं इंग्लंड दौऱ्यात ४ पैकी दोन सामने खेळले आहेत. यातील ३ डावांमध्ये त्यानं ३९ च्या सरासरी आणि १०२.६३ स्ट्राइक रेटनं ११७ धावा केल्या होत्या. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय मालिकेत ७ विकेट्स देखील मिळवल्या होत्या. 

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दिपक चहर

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सआयपीएल २०२१
Open in App