T20 World Cup : पाकिस्तानकडून पराभवानंतर Mohammed Shamiवर खालच्या पातळीची टीका; Omar Abdullah यांची टीम इंडियावर टीका

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तान संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर पहिल्या विजयाची नोंद केली. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानला १० विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:45 PM2021-10-25T15:45:30+5:302021-10-25T15:45:57+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2021: Omar Abdullah slams the Indian team for not taking a stand for Mohammad Shami after abuse | T20 World Cup : पाकिस्तानकडून पराभवानंतर Mohammed Shamiवर खालच्या पातळीची टीका; Omar Abdullah यांची टीम इंडियावर टीका

T20 World Cup : पाकिस्तानकडून पराभवानंतर Mohammed Shamiवर खालच्या पातळीची टीका; Omar Abdullah यांची टीम इंडियावर टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तान संघानं वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर पहिल्या विजयाची नोंद केली. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानला १० विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला. शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीलाच धक्के दिल्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं १५१ धावा केल्या. पण, पाकिस्तानला विजय मिळवण्यापासून रोखण्यासाठी त्या पुरेशा ठरल्या नाही. या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्यावर नेटिझन्सकडून खालच्या पातळीवर टीका होऊ लागली. क्रिकेट चाहत्यांच्या या वागणुकीवर अनेकांनी टीका केली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्लाह ( Omar Abdullah ) यांनी टीम इंडियावर निशाणा साधला.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय खेळाडू #BlackLiveMatter मोहिमेला पाठिंबा देताना गुडघ्यावर बसले होते. पण, सामन्यानंतर शमीवर हीन दर्जाची टीका होऊनही भारतीय संघातील एकाही खेळाडूनं जाहीरपणे त्याला पाठिंबा दिलेला नाही किंवा घडत असलेल्या प्रसंगाचा निषेधही केलेला नाही. असा आरोप करताना अबदुल्लाह यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ( JKNC) चे नेते ओमार अब्दुल्लाह यांनी भारतीय संघावर टीका केली. ते म्हणाले, काल पराभूत झालेल्या ११ खेळाडूंपैकी एक मोहम्मद शमी होता. हा सामना खेळणारा तो एकमेव खेळाडू नव्हता. #BlackLiveMatter साठी टीम इंडियाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, परंतु संघातील खेळाडूवर खालच्या दर्जाची टीका होत असताना त्याच्यामागे कुणीच उभा राहिलेला नाही. 


प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.
भारताचा दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्घ होणार आहे. 

Web Title: T20 World Cup 2021: Omar Abdullah slams the Indian team for not taking a stand for Mohammad Shami after abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.