Join us  

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पंचानं केली मोठी गडबड; ६ दिवसांसाठी स्पर्धेतून बाहेर काढलं!

ICC T20 World Cup 2021: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेतील एका पंचावर सहा दिवस स्पर्धेबाहेर राहण्याची नामुष्की ओढावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 12:22 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेतील एका पंचावर सहा दिवस स्पर्धेबाहेर राहण्याची नामुष्की ओढावली आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. इंग्लंडचे पंच मायकल गॉफ (Michael Gough) यांनी बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील सहा दिवसांसाठी त्यांना स्पर्धेत पंचाची भूमिका निभावण्यापासून दूर करण्यात आलं आहे. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इंग्लंडमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती दिली आहे. 

मायकल गॉफ यांच्यावर आयसीसीच्या बायो सुरक्षा समितीनं यूएईमध्ये कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना काही दिवसांसाठी स्पर्धेपासून दूर राहावं लागणार आहे. मायकल गॉप यांचा क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम पंचांमध्ये समावेश होतो. 

समोर आलेल्या माहितीनुसार गॉफ हे शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता हॉटेलच्या बाहेर गेले होते. बायो बबलच्या बाहेरील व्यक्तीची त्यांनी भेट घेतली होती. आयसीसीच्या प्रवक्त्यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे. बायो सुरक्षा समितीनं पंच मायकल गॉफ यांनी प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना काही दिवस स्पर्धेपासून दूर राहावं लागणार आहे. या कालावधीत गॉफ यांना आता पंचाची भूमिका पार पडता येत नाही. 

भारत-न्यूझीलंड सामन्यात निभावणार होते पंचाची भूमिकामायकल गॉफ हे भारत-न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्याच पंच म्हणून काम करणार होते. पण त्यांनी बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हटवण्यात आलं. त्यांच्याजागी दक्षिण आफ्रिकेचे मरे इरॅस्मस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. सध्या मायकल गॉफ हॉटेलच्या एका खोलीत क्वारंटाइन आहेत. पुढील सहा दिवस एक दिवस आड त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पुढील सहा दिवसांतील चाचणीत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच ते पुन्हा एकदा मैदानात पंचाची कामगिरी पार पाडू शकतात. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ऑफ द फिल्ड
Open in App