Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड! अनोखे त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय, तर जगातला दुसरा खेळाडू

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : एका महिन्याच्या विश्रांतीनंतर विराट कोहली मैदानावर उतरला अन् मोठा विक्रम करून गेला... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 6:24 PM

Open in App

Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अडीच वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर तो विश्रांतीवर गेला होता आणि वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळला नव्हता. आज तो पुनरागमन करतोय आणि पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅट तळपेळ अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, विराटने मैदानावर पाऊल टाकताच मोठा विक्रम केला आहे. विराट कोहली याच्यासाठी हा ऐतिहासिक सामना ठरला. 

आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात प्रथमच लढत होतेय. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या १४ लढतींपैकी ८ मध्ये भारताने बाजी मारली आहे,  तर ५ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. १ लढत अनिर्णीत राहिली. पण, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर येत असल्याने जास्त हवा झाली आहे. नसीम शाह याला आज ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी मिळाली आहे.  त्याने १३ कसोटींत ३३ व ३ वन डेत १० विकेट्स घेतल्या आहेत. Naseem Shah making his T20I debut today. भारताविरुद्ध ट्वेंटी-२०त पदार्पण करणारा तो चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला. यापूर्वी सोहैल तन्वीर ( २००७ वर्ल्ड कप), मोहम्मद इरफान ( २०१२) व खुर्रम मनझूर ( २०१६ आशिया चषक) यांनी भारताविरुद्ध पदार्पण केले होते.Asia Cup 2022, Ind vs Pak Live Match

जवळपास  महिन्याभराच्या विश्रांतीनंतर विराट मैदानावर परतणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना विराटचा १००वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे आणि क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये १००+ सामने खेळणारा तो जगातील दुसरा व भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने हा पराक्रम प्रथम केला आहे. विराटने १०० ट्वेंटी-२०, १०२ कसोटी व २६२ वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहित शर्मा याच्यानंतर ( १३२ सामने) भारताकडून १०० ट्वेंटी-२० सामना खेळणारा विराट दुसरा खेळाडू आहे. 

विराटने ९९ सान्यांत ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत.  त्यात ३० अर्धशतकांचा समावेश आहे.  १०२ कसोटीत विराटने ४९.५३च्या सरासरीने ८०७४ धावा केल्या आहेत, तर २६२ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ५७.६८च्या सरासरीने १२३४४ धावा आहेत. विराटने एकूण ७० आंतरराष्ट्रीय शतकं व १२२ अर्धशतकं झळकावली आहेत.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीरॉस टेलर
Open in App