शारजा, टी-10 लीग : पंजाबी लिजंड्स संघाचा सलामीवीर उमर अकमल आणि ख्रिस जॉर्डन यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांना 20 षटकांमध्ये 5 बाद 107 अशी धावसंख्या उभारता आली.
केरला नाईट्स संघाने नाणेफेक जिंकत लिजंट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. उमरने पहिल्या षटकापासूनच केरलाच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. उमरने 17 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 30 धावा केल्या. मोहम्मद नवीदने उमरला त्रिफळाचीत करत केरला संघाला मोठे यश मिळवून दिले. पण लिजंट्सचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे लिजंट्स संघाला शतकाची वेस ओलांडता आली. जॉर्डनने सात चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद 24 धावा केल्या.