Join us

T10 League: सुनील नरीनची दणदणीत फटकेबाजी, बंगालच्या 123 धावा

नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरला नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:05 IST

Open in App

शारजा, टी-10 लीग : बंगाल टायगर्सचा सलामीवीर सुनील नरीनने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरला नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या.

 

 

केरला संघाने नाणेफेक जिंकून बंगालच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या संधीचा फायदा नरीनने चांगलाच उचलला. नरीनने 25 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकार यांच्यामदतीने 52 धावा केल्या. नरीनला यावेळी शेरफन रुदरफोर्डने 17 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. केरला संघाकडून वेन पार्नेलने दोन बळी मिळवले.

टॅग्स :टी-10 लीग