T10 League: शेन वॉटसनचे धडाकेबाज अर्धशतक

वॉटसनने 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 23:43 IST2018-11-27T23:43:01+5:302018-11-27T23:43:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T10 League: Shane Watson's half-century | T10 League: शेन वॉटसनचे धडाकेबाज अर्धशतक

T10 League: शेन वॉटसनचे धडाकेबाज अर्धशतक

शारजा, टी-10 लीग : कर्णधार शेन वॉटसनच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर सिंधीस संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 91 धावा केल्या.



नॉर्दन वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून सिंधीस संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वॉटसनने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत वॉरियर्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. वॉटसनने 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावांची खेळी साकारली. वॉटसनच्या अर्धशतकानंतरही सिंधीस संघाला शतकाची वेस ओलांडता आली नाही. कारण वॉटसनला संघातील अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही.


वॉरियर्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण त्यांना वॉटसनला झटपट बाद करण्यात अपयश आले. वॉरियर्सकडून आंद्रे रसेल, हॅरी गुर्नी आणि हार्डस व्हिलजॉइन यांनी प्रत्येकी  दोन बळी मिळवले.

Web Title: T10 League: Shane Watson's half-century