Join us

T10 League: पहिल्या सामन्यात 16 चेंडूत 74 धावा करणारा शहजाद आज पहिल्याच षटकात माघारी

T10 League: सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारणारा शहजाद लवकर माघारी परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 17:21 IST

Open in App

शारजा, टी-10 लीग : रजपूत संघाच्या मोहम्मद शहजादने टी-10 लीगच्या पहिल्याच सामन्यात 16 चेंडूत 74 धावा चोपण्याचा पराक्रम केला. मात्र, शुक्रवारी त्याला पहिल्याच षटकात माघारी फिरावे लागले. टी-10 लीगमध्ये आज रजपूत विरुद्ध पखतून्स हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पखतून्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे रजपूतच्या शहजादची आतषबाजीची उत्सुकता लागली, पण...

शहजादने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून चाहत्यांच्या आशा पल्लवीत केल्या. सोहेल तन्वरच्या गोलंदाजीवर तो आणखी प्रहार करणार असे वाटत असताना षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो माघारी फिरला. फटका मारण्याच्या नादात तो शाहिद आफ्रिदीच्या हातात झेल देऊन माघारी परतला. त्याच्या बाद होण्याने शहजादने पहिल्या सामन्यातील 74 धावांच्या खेळीत आठ उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सिंधी संघाने सलामीच्या सामन्यात 10 षटकांत 6 बाद 94 धावा केल्या होत्या

टॅग्स :टी-10 लीग