Join us

T10 League: पहिल्या फेरीत पखतून्स आणि वॉरियर्स अव्वल

'अ' गटामध्ये पखतून्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राजपूतचा संघ. या गटात तिसरे स्थान केरला नाईट्स या संघाने पटकावले आहे, तर तळाला सिंधीस हा संघ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 16:31 IST

Open in App
ठळक मुद्देपहिल्या फेरीत सर्व संघांचे तीन सामने झाले आहेत.या तीन सामन्यांमध्ये पखतून्स संघाने दोन सामने जिंकून चार गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 'ब' गटामध्ये वॉरियर्स आणि बंगाल टायगर्स या संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत.

शारजा, टी-10 लीग : दिमाखात सुरु असलेल्या  टी-10 लीगची पहिली फेरी संपली आहे. या पहिल्या फेरीत 'अ' गटातून पखतून्स हा संघ अव्वल ठरला आहे, तर 'ब' गटामध्ये नॉर्दन वॉरियर्स हा संघ पहिला आला आहे. पहिल्या फेरीत सर्व संघांचे तीन सामने झाले आहेत. या तीन सामन्यांमध्ये पखतून्स संघाने दोन सामने जिंकून चार गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 'ब' गटामध्ये वॉरियर्स आणि बंगाल टायगर्स या संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत. पण नेट रन रेटच्या आधारावर वॉरियर्सने अव्वल स्थान पटकावले आहे.'अ' गटामध्ये पखतून्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राजपूतचा संघ. या गटात तिसरे स्थान केरला नाईट्स या संघाने पटकावले आहे, तर तळाला सिंधीस हा संघ आहे.'ब' गटामध्ये वॉरियर्स आणि टायगर्स हे या दोन्ही संघांचे समान चार गुण आहे. पण नेट रनरेटमुळे वॉरियर्स अव्वल ठरला आहे तर टायगर्स दुसऱ्या स्थानावर आहेत. या गटात मराठा अरेबियन्स तिसऱ्या आणि पंजाबी लिजंड्स चौथ्या स्थानावर आहे.

टॅग्स :टी-10 लीग