Join us

KKRनं डच्चू दिलेल्या फलंदाजानं सहा दिवसांत झळकावली चार अर्धशतकं

कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 18:11 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. यात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे. लीनला डच्चू देण्याचा निर्णयाचा पश्चाताप KKRला होत आहे. कारण, लीननं टी 10 लीगमध्ये मागील सहा दिवसांत चार अर्धशतकी खेळी केली. 

टी 10 लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीननं ही खेळी साकारली. टी 10 तिसऱ्याच सामन्यात लीननं 30 चेंडूंत नाबाद 91 धावा चोपल्या होत्या.  लीन 30 चेंडूंत 9 चौकार व 7 षटकार खेचून 91 धावांवर नाबाद राहिला होता. त्यानं 303.33च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली होती. या खेळीसह त्यानं 2018मध्ये अ‍ॅलेक्स हेल्सनं नोंगवलेला नाबाद 87 धावांचा विक्रम मोडला होता. दहा षटकांच्या स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.   

लीनची ही फटकेबाजी अजूनही कायम आहे. त्यानंतर त्यानं कर्नाटका टस्कर्स संघाविरुद्ध 31 चेंडूंत 2 चौकार व 6 षटकार खेचून 61 धावा चोपल्या. दिल्ली बुल्स संघाविरुद्धही त्यानं 33 चेंडूंत 5 चौकार व 9 षटकारांसह 89 धावा कुटल्या. शनिवारीही लीननं कलंदर संघाविरुद्ध 30 चेंडूंत 67 धावांची वादळी खेळी केली. यात त्यानं 4 चौकार व 6 षटकारांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :टी-10 लीगकोलकाता नाईट रायडर्स