Join us

T10 League: मराठा अरेबियन्सचा राजपुत संघावर दणदणीत विजय

मराठा अरेबियन्सच्या  गोलंदाजांनी भेदक मारा करत  राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. मराठा अरेबियन्सने हे आव्हान एकही बळी न गमावता पाच षटकांमध्ये पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:38 IST

Open in App

शारजा, टी-10 लीग : मराठा अरेबियन्स संघाने भेदक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर राजपूत संघावर 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. मराठा अरेबियन्सच्या  गोलंदाजांनी भेदक मारा करत  राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. मराठा अरेबियन्सने हे आव्हान एकही बळी न गमावता पाच षटकांमध्ये पूर्ण केले.

मराठा अरेबियन्सच्या हझरतुल्हा झाझईने 12 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावरनाबाद 29 धावांची खेळी साकारली. झाझईला यावेळी अॅडम हेल्सने चांगली साथ दिली. हेल्सने 18 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 27 धावा केल्या.

मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. त्यामुळे निर्धारीत 10 षटकांमध्ये राजपूत संघाची 7 बाद 63 अशी अवस्था झाली. मराठा अरेबियन्स संघाकडून  रीचर्ड ग्लीसनने फक्त 9 धावांमध्ये दोन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर जेम्स फॉल्कनरने 13 धावांत दोन बळी मिळवले. यावेळी राजपूत संघाच्या फक्त एकाच फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली. 

टॅग्स :टी-10 लीग