Join us

T10 League: मराठा अरेबियन्स रजपूत्सवर पडले भारी, पाच षटकांत जिंकला सामना

T10 League: मराठा अरेबियन्सने पाच षटकांत सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:22 IST

Open in App
ठळक मुद्देमराठा अरेबियन्सने पाच षटकांत सामना जिंकला.रजपूत्स संघाला 63 धावांवर रोखलेफॉल्कनर व ग्लीसनचा भेदक मारा

शारजाह, टी-10 लीग: भेदक गोलंदाजीच्या जोरावर मराठा अरेबियन्सने टी१० क्रिकेट लीग स्पर्धेत रजपूत्सला केवळ ६३ धावातच रोखले. त्यानंतर हे लक्ष्य केवळ ५ षटकांत पूर्ण करत मराठ्यांनी धमाकेदार १० गड्यांनी बाजी मारली.मराठा अरेबियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रिचर्ड ग्लेसन आणि राशिद खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर रजपूत्स संघाला दहा षटकांत केवळ ५ बाद ६३ धावाच करता आल्या. ग्लेसन याने मोहम्मद शहजादला बाद करत रजपूत्सला पहिला धक्का दिला. त्यानंतर रजपूत्सचे फलंदाजीला गळती लागली. बेन रॉबर्ट डंक (१५ धावा) याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ब्रेंडन मॅक्क्युलम ११ चेंडूत ७ धावा आणि रोशन मुस्तफा १० चेंडूत ७ धावा यांनी संथ खेळी केल्याने संघ अडचणीत आला.वॅन डेर मेरवे व ब्रावो यांनी प्रत्येकी एक तर रिचर्ड ग्लेसन अणि जेम्स फॉकनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. २ षटकांत ९ धावा देत २ गडी बाद करणाऱ्या ग्लेसन याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. लक्ष्याचा पाठलाग करताना मराठ्यांच्या हर्जातुल्लाह झाजई नाबाद २९ आणि अ‍ॅलेक्स हेल्स नाबाद २७ यांनी निर्धारीत लक्ष्य पाच षटकांतच पुर्ण केले. रजपूत्स संघाने आठ अवांतर धावा देत मराठ्यांच्या विजयात हातभारही लावला.मराठ्यांचा भेदक मारारिचर्ड ग्लेसन (२/९) व जेम्स फॉल्कनर (२/१३) यांनी भेदक मारा करत राजपूत्सला फटकेबाजीपासून दूर ठेवले. आघाडीचे तिन्ही फलंदाज स्वस्तात परतल्याने रजपूत्सचे इतर फलंदाज दबावाखाली आले. यामुळे त्यांना मोठी मजल मारता आली नाही.

टॅग्स :टी-10 लीग