T10 League: जॉनी बेअरस्टोची कमाल, केरलाची धमाल

जॉनीने दमदार खेळी साकारली आणि केरला संघाने सात विकेट्स आणि 14 चेंडू राखून सोपा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:55 IST2018-11-30T18:54:10+5:302018-11-30T18:55:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T10 League: Johnny Bairstow's sensational batting , Kerala wins last match | T10 League: जॉनी बेअरस्टोची कमाल, केरलाची धमाल

T10 League: जॉनी बेअरस्टोची कमाल, केरलाची धमाल

शारजा, टी-10 लीग : जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केरला नाईट्स संघाने बंगाल टायगर्सवर सहज विजय मिळवला. सुनील नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरला नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करत असताना जॉनीने दमदार खेळी साकारली आणि केरला संघाने सात विकेट्स आणि 14 चेंडू राखून सोपा विजय मिळवला.


धावांचा पाठलाग करायला केरलाचा संघ तरला खरा, पण त्यांची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पण जॉनीने 24 चेंडूंत सहा चौकार आणि आठ षटाकारांच्या मदतीने नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जॉनीच्या या खेळीच्या जोरावर केरलाने बंगालवर मात केली.



बंगाल टायगर्सचा सलामीवीर सुनील नरीनने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. नरीनच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगाल टायगर्स संघाला केरला नाईट्स या संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 123 धावा करता आल्या.
केरला संघाने नाणेफेक जिंकून बंगालच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या संधीचा फायदा नरीनने चांगलाच उचलला. नरीनने 25 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकार यांच्यामदतीने 52 धावा केल्या. नरीनला यावेळी शेरफन रुदरफोर्डने 17 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. केरला संघाकडून वेन पार्नेलने दोन बळी मिळवले.



Web Title: T10 League: Johnny Bairstow's sensational batting , Kerala wins last match